Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रसचिन वाझेंच्या सोसायटीमधून CCTV फुटेज गायब; मात्र NIA ला पुरावे मिळाले?

सचिन वाझेंच्या सोसायटीमधून CCTV फुटेज गायब; मात्र NIA ला पुरावे मिळाले?

antilia-explosive-seizure-case-news-and-update-cctv-footage-seized-by-sachin-wazes-team-from-his-society
antilia-explosive-seizure-case-news-and-update-cctv-footage-seized-by-sachin-wazes-team-from-his-society

मुंबई: मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाच्या बाहेरुन जिलेटिनने भरलेली स्कॉर्पियो आढळली होती. या प्रकरणात CIU चे माजी चीफ सचिन वाझेंच्या अटकेनंतर रोज नवनवीन खुलासे होत आहेत. 25 फेब्रुवारीला सचिन वाझेंकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. आता सचिन वाझेंच्या टीमने ठाण्याच्या साकेत कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या CCTV कॅमेरांचा DVR आपल्या ताब्यात घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. NIA च्या टीमने त्या DVR पुन्हा एकदा मिळवल्या आहेत.

आता प्रश्न उपस्थित होत आहे की, अखेर क्राइम इन्वेस्टिगेशन यूनिट (CIU) च्या लोकांनी वाझेंच्या सोसायटीमधून डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (DVR)का हटवला होता? दरम्यान NIA ला माहिती मिळाली आहे की, स्कॉर्पियो चोरी झालीच नव्हती.

सोसायटीने DVR देण्यापूर्वी लिखित पुरावा मागितला होता
सोसायटीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “CIU च्या टीमचे चार लोक 27 फेब्रुवारीला सोसायटीच्या क्लब हाऊस येथे आले आणि त्यांनी DVR जप्त करण्यास सांगितले. यावर सोसायटीच्या सदस्यांनी सांगितले की कोणत्याही लेखी आदेशाशिवाय त्यांना DVR देऊ शकत नाही.

यानंतर पोलिसांपैकी एकाने त्यांना लेखी नोट दिली. ज्यावर असे लिहिले होते की, ‘कलम CRPC नुसार आम्ही साकेत सोसायटीला नोटीस देत आहोत की मुंबई गुन्हे शाखा, CIU, DCB, CID मुंबईला कलम 286, 465, 473, IPC 120 (B), इंडियन एक्सप्लोसिव्ह अॅक्टमध्ये दाखल FIR क्रमांक 40/21 च्या तपासासाठी साकेत सोसाइटीचे दोन्ही व्हिडिओ रेकॉर्डर हवे आहेत. नोटिशीत तपासाला सहयोग करण्याचा आदेशही देण्यात आला होता.’

रियाजुद्दीन काजी देखील संशयाच्या भोवऱ्यात
NIA ने वझेंच्या नेतृत्वामध्ये काम करणाऱ्या दोन अधिकारी CIU चे API रियाजुद्दीन काजी आणि एक PSI व्यतिरिक्त दोन ड्रायव्हरांची सोमवारी साडे 9 तास चौकशी केली आहे. ही चौकशी आजही सुरू राहणार आहे आणि या प्रकरणामध्ये NIA काही इतर लोकांनाही अटक करु शकते. CIU ची जी टीम वाझेंच्या सोसायटीमध्ये DVR घेण्यासाठी पोहोचली होती त्यामध्ये काजीही सहभागी होती.

स्कॉर्पियो चोरी न होण्याचे संकेत मिळाले
दरम्यान NIA सूत्रांच्या आधारावर एक मोठी माहिती समोर आली आहे. CCTV फुटेजच्या तपासात समोर आले आहे की, मनसुख यांची स्कॉर्पियो कधी चोरीच झाली नव्हती. तर ही स्कॉर्पियो 18 ते 24 फेब्रुवारीच्या काळात अनेक वेळा सचिन वाझेंच्या सोसायटीमध्ये दिसली होती. हिरेन यांनी आपल्या जबाबात सांगितले होते की, 17 फेब्रुवारीला मुलुंड-ऐरोली रोडवरुन त्यांची स्कॉर्पियो गायब झाली होती. फॉरेंसिक रिपोर्टवरुनही सिद्ध होते की, कारमध्ये कोणतीही फोर्स एंट्री झालेली नाही. गाडी चावीने उघडण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments