Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रअशोक चव्हाणांना वाहतूक कोंडीचा फटका

अशोक चव्हाणांना वाहतूक कोंडीचा फटका

Ashok Chavan caught in mumbai trafficमुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईतील काँग्रेसच्या गांधीभवन येथील कार्यालयात बुधवारी लोकदरबार भरवला होता. या कार्यक्रमाला पोहचण्यासाठी त्यांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडीला कंटाळून अखेर अशोक चव्हाण गाडीतून बाहेर पडले आणि त्यांनी पायी चालत काँग्रेस कार्यालय गाठले.

याबद्दल अशोक चव्हाण यांनी ट्वीट केले आहे. “कुलाबा परिसरातील वाहतूक कोंडीमुळे प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित लोकदरबार कार्यक्रमाला जाण्यास उशीर झाला. त्यामुळे काही अंतरावर गाडी सोडून मी पायी चालतच गांधी भवन गाठले.” असे चव्हाण म्हणाले.

मंत्रालयात प्रचंड गर्दी असल्याने समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मदत करता येत नाही. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी दर बुधवारी कुलाबा येथील पक्ष कार्यालयात अशोक चव्हाण हे बुधवारी लोकदरबार भरवण्यात येतो. त्यामुळे या ठिकाणी राज्यभरातून शेकडो नागरिक समस्या घेऊन येतात


याअगोदरही नेत्यांना बसलाय वाहतूक कोंडीचा फटका

मुंबईतील वाहतूक कोंडींचा याअगोदरही अनेक मंत्र्यांना फटका बसला आहे. शिवसेनेचे नेते विजय शिवतारे राज्यमंत्री असताना 19 जून 2018 रोजी त्यांना गोरेगाव ते चर्चगेट असा लोकल प्रवास करावा लागला होता. तर काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा पाउण तास वाहतूक कोंडीत अडकला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments