Friday, March 29, 2024
Homeदेशदाऊद इब्राहिमच्या घर, हॉटेल आणि गेस्ट हाऊसचा आज लिलाव

दाऊद इब्राहिमच्या घर, हॉटेल आणि गेस्ट हाऊसचा आज लिलाव

महत्वाचे…
१.आतापर्यंत दाऊदच्या मुंबई आणि मुंबईबाहेरील अशा एकूण १० प्रापर्टी जप्त केल्या २.दाऊदचे मुंबईतले घर, हॉटेल आणि गेस्ट हाऊससाठी चर्चगेटमधल्या इंडियन मर्चंट चेंबरच्या कार्यालयात बोली लावणार ३. ३.संपत्ती विकत घेण्यासाठी आतापर्यंत १२ जणांनी महसूल विभागाकडे माहिती मागवली


मुंबई – कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा आज लिलाव होणार आहे. दाऊदचे मुंबईतले घर, हॉटेल आणि गेस्ट हाऊससाठी चर्चगेटमधल्या इंडियन मर्चंट चेंबरच्या कार्यालयात बोली लावली जाईल.

सीबीआयने परकीय चलन आणि गुन्हेगारी संपत्ती कायद्यांतर्गत आतापर्यंत दाऊदच्या मुंबई आणि मुंबईबाहेरील अशा एकूण १० प्रापर्टी जप्त केल्या आहेत. ज्यामधील ३ गोष्टींचा आज लिलाव होणार आहे. भेंडी बाजार येथील याकूब रस्त्यावरील शबनम गेस्ट हाऊस, पाकमोडिया रस्त्यावरील डांबरवाला इमारतीतील ५ घरे आणि हॉटेल रौनक अफरोज यांचा समावेश आहे.
हा लिलाव सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू असेल. दाऊदची संपत्ती विकत घेण्यासाठी आतापर्यंत १२ जणांनी महसूल विभागाकडे माहिती मागवली आहे. इच्छुक बंद लिफाफा, स्वत: उपस्थित राहून किंवा ई – ऑक्शनमध्ये सहभागी होऊन बोली लावणार आहेत.
दाऊदच्या डांबरवाला बिल्डिंग, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई या घराचा लिलाव होणार आहे. या घराची सुरुवातीची किंमत १ कोटी ५५ लाख ७६ हजार आहे. हॉटेल रौनक अफरोज याचाही लिलाव होणार असून त्याची सुरुवातीची किंमत १ कोटी १८ लाख ६३ हजार आहे. तर शबनम गेस्ट हाऊसच्या लिलावाची सुरुवातीची किंमत १ कोटी २१ लाख ४३ हजार आहे.
हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी स्वामी यांनी याआधी दाऊदची कार विकत घेतली होती. नंतर दहशतवादाचे प्रतिक सांगून गाजियाबादमध्ये त्यांनी ही कार पेटवून दिली होती. आजच्या लिलावातही चक्रपाणी स्वामी सहभागी झाले आहेत. स्वामी चक्रपाणी या लिलावात सहभागी होऊन दाऊदच्या हॉटेलवर बोली लावणार आहेत. जर स्वामी चक्रपाणी यांना अफरोज हॉटेल विकत घेण्यात यश आले तर ते हॉटेलच्या जागी भव्य शौचालय बांधणार आहेत. स्वत: स्वामी चक्रपाणी यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.
याआधीही दाऊदच्या संपत्तीच्या लिलावासाठी राज्य सरकारच्या महसूल विभागाने वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. २०१५ मध्ये दाऊदच्या संपत्तीचा लिलाव झाला होता. पत्रकार बालाकृष्ण यांनी दाऊदच्या रौनक अफरोज हॉटेल लिलावात खरेदी केले होते. पण ३० लाख रुपये जमा केल्यानंतर उर्वरित ४ कोटी रुपये त्यांना देता आले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा हॉटेलचा लिलाव होणार आहे. आधीदेखील दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करण्यात आला होता. मात्र दाऊदचे इतर नातेवाईक यांनी धमक्या देऊन लिलावात सामील झालेल्यांना मालमत्ता मिळू दिली नसल्याचे समजते. मात्र आता दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर हा खंडणीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या अटकेत असल्याने हा लिलाव पद्धतशीरपणे पार पडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments