Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रपोलिसांनी परवानगी नाकारल्यास एल्गार परिषद रस्त्यावर घेेऊ: बी. जी. कोळसे पाटील

पोलिसांनी परवानगी नाकारल्यास एल्गार परिषद रस्त्यावर घेेऊ: बी. जी. कोळसे पाटील

पुणे : आम्ही यंदा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे एल्गार परिषद घेण्याबाबत परवानगी मागितली. पण ती नाकारण्यात आली असून आता आम्ही ३० जानेवारी रोजी कला क्रीडा रंगमंच येथे एल्गार परिषद घेणार आहोत. पोलिसांनी परवानगी नाकारल्यास रस्त्यावर एल्गार परिषद घेऊ, असा इशारा भूमिका भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान पुणे समन्वय समितीचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत इशारा दिला आहे.

पुण्यात २०१७ मध्ये एल्गार परिषद घेतली गेली. त्यानंतर जी घटना घडली. त्या प्रकरणी आमच्या परिषदेला बदनाम करण्याचे काम करण्यात आले. पण तरी देखील आम्ही आमचे विचार प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहोत. त्यासाठी

अखेर जेलभरोची आमची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बी. जी. कोळसे पाटील म्हणाले की, अन्न वस्त्र, निवारा, आरोग्य आणि चांगले शिक्षण याभोवती राजकारण फिरले पाहिजे. यासाठी आमचा मागील कित्येक वर्षापासून आमचा लढा सुरू आहे. तेच आम्ही काम करतोय. पण हिंदू मुस्लिम, लव्ह जिहाद, जाती धर्म या भवती राजकारण फिरत आहे. हे चुकीचे असून आम्ही एल्गार परिषदेच्या माध्यमातून जनतेला मूलभूत हक्क मिळण्याच्या दृष्टीने विचार मांडण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, मागील तीन वर्षापूर्वी एल्गार परिषदेच्या नंतर जी घटना घडली आणि अनेक संदर्भ जोडले गेले. ते चुकीचे असून या परिषदेच्या पैशांबाबत सांगयाचे झाल्यास यामध्ये आमचा एकही पैसा लागला नाही. आमच्यावर खोटे आरोप केले. ज्या व्यक्ती सोबत नाव जोडले गेले. त्यांना कधी ही भेटलो नाही. हे यापूर्वी देखील तपास यंत्रणेला सांगितले असून आज देखील तेच सांगतो. माझ्या घरी जरी आला. तर काहीच नसून ईडी देखील वेडी होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सरकार नवीन आलं तरी जुनी बाटली आणि नवीन 

देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेली सुरक्षा या सरकारने ज्या दिवशी शपथ घेतली त्याच दिवशी काढून घेतली. मात्र मला सुरक्षा नकोच असे सांगत राज्य सरकारवर त्यांनी निशाणा साधला. तर सरकार नवीन आलं तरी जुनी बाटली आणि नवीन पाणी आहे. तर भिडे, एकबोटे, फडणवीस यांचे एकत्र फोटो दाखवतो, असे सांगत भिडे आणि एकबोटे यांच्या अटकेबाबतची भूमिका बी. जी. कोळसे पाटील यांनी मांडली.

शरद पवारांना मी भेटणार नाही  
शरद पवार यांनी मी मुख्यमंत्री असतो तर पुण्याच्या पोलीस आयुक्तांना सस्पेंड केले असते असं एका जाहीर कार्यक्रमात शरद पवार म्हटले होते. एल्गार प्रकरणी चुकीचा तपास झाला. खोटे गुन्हे दाखल झाले हे पवारांना माहिती आहे. तरी देखील हे सरकार आणि पोलीस एल्गार परिषद घेऊ देत नाहीत. पण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा होतात. हे सर्व चालते असा सवाल उपस्थित करीत सध्याच्या एकूणच परिस्थिती बाबत आमचे कार्यकर्ते शरद पवार यांना भेटले आहे. पण मी त्यांना भेटणार नसल्याचे बी. जी. कोळसे पाटील यांनी सांगितले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments