Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रमहापरिनिर्वाण दिनानिमित्त थेट प्रक्षेपण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ऑनलाईन अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त थेट प्रक्षेपण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ऑनलाईन अभिवादन

मुंबई l भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण  दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी कोविड-१९च्या  संकटामुळे चैत्यभूमीवर न येता प्रत्येकाने घरूनच ऑनलाईन माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.

यावेळी मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि राजकीय नेते उपस्थित होते. दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर अलोट गर्दी होते. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर घरातूनच आदरांजली अर्पण करण्याचं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलं होते. पण, बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंंत्री अजित पवार, शरद पवार हे सकाळी आठ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते. बाबासाहेबांना पुष्प अर्पण करून मान्यवरांनी आदरांजली वाहिली.

यानंतर लोकराज्य मासिकाचं प्रकाशन राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. करोनामुळे राज्य सरकारनं चैत्यभूमीवर गर्दी करण्याचं टाळत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला भीम अनुयायांनी प्रतिसाद दिला.

सोशल मीडियावरून ऑनलाईन थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी लिंक

यू टय़ूबः bit.ly/abhivadan2020yt
फेसबुकः bit.ly/abhivadan2020fb
ट्विटर : bit.ly/abhivadan2020tt

दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून सकाळी ७.४५ ते ९ या वेळेत शासकीय मानवंदना व हेलिकाॅप्टरद्वारे पुष्पवृष्टीचे थेट प्रक्षेपण. त्यानंतर, सकाळी ९.५०, १०.५०, ११.५० दुपारी १२.५० वाजता दर १० मिनिटांसाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments