नवी मुंबईत बँकेवर दरोडा!

- Advertisement -

महत्वाचे…
१.नवी मुंबईतील जुईनगर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेवर दरोडा २. जमिनी खालून भुयार खोदून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला ३. जुईनगर सेक्टर ११ मधील ही घटना


नवी मुंबई – जुईनगर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेवर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. जमिनी खालून भुयार खोदून भुयारी मार्गाने चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. फरार दरोडेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. जुईनगर सेक्टर ११ मधील ही घटना आहे. बँक ऑफ बडोदातील ग्राहकांच्या २३७ लॉकर पैकी २७ लॉकर्सवर चोरट्यांनी हात साफ केला आहे. या सर्व लॉकरमध्ये सोन्याचे दागिने होते अशी माहिती पोलिसांनी दिली.

बाजूला असलेल्या खाद्य पदाच्या दुकानातून चोरट्यांनी भुयारी मार्गाने बनवला व बँकेवर दरोडा घातला. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांचे पथक दरोडाखोरांचा शोध घेत आहेत.

- Advertisement -
- Advertisement -