चिंताजनक: महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं मुख्य सचिवांना पत्र

- Advertisement -
beginning-of-a-second-wave-of-covid-19-in-maharashtra-central-health-minister-letter-to-chief-secretory-news-updates
beginning-of-a-second-wave-of-covid-19-in-maharashtra-central-health-minister-letter-to-chief-secretory-news-updates

मुंबई: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. यासंबंधीचं पत्र केंद्रीय समितीने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलं आहे. यांनी लिहिलेल्या या पत्रात राज्यात कोरोना स्थितीवर गंभीर पावलं उचलली जात नसल्याची टिप्पणी देखील केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय समिती राज्याच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी कोरोनाविषयक सुविधांचा आढावा या समितीने घेतला होता.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी राज्याच्या मुख्य सचिवांनी पत्र लिहिलं आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ही सुरूवात असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये कोरोनासंदर्भातील परिस्थितीवर राज्य सरकारकडून गंभीर पावलं उचलली जात नसल्याचं म्हटलं आहे. दोन आठवड्यांपूर्वी 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची एक टीम राज्याच्या दौऱ्यावर आली होती. या टीमने 8 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.

beginning-of-a-second-wave-of-covid-19-in-maharashtra-central-health-minister-letter-to-chief-secretory-news-updates
beginning-of-a-second-wave-of-covid-19-in-maharashtra-central-health-minister-letter-to-chief-secretory-news-updates

केंद्राच्या टीमने मुंबईतील एस आणि टी वॉर्डमध्ये तसेच ठाणे, नाशिक, धुळे औरंगाबाद, जळगाव याठिकाणी पाहणी केली होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशन-क्वारंटाईन फॅसिलिटीजची काय परिस्थिती आहे याचा आढवा या टीमनं घेतला होता.

- Advertisement -
- Advertisement -