Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्र‘दैनिक मुंबई माणूस’ ला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक वृत्तपत्र पुरस्कार

‘दैनिक मुंबई माणूस’ ला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक वृत्तपत्र पुरस्कार

NAI AWARD, Nikhiul Sagare, Akshay Redij, NAI Awards, Mumbai Manoos, Best Regional Newspaperमुंबई : न्यूजपेपर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने यंदाचा सर्वात्कृष्ट प्रादेशिक वृत्तपत्र पुरस्कार ‘दैनिक मुंबई माणूस’ला मिळाला. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि ट्राॅफी देण्यात आली. हा पुरस्कार दैनिक मुंबई माणूसचे अक्षय रेडीज, निखिल सगरे यांनी स्विकारला. हा पुरस्कार सोहळा नवी दिल्ली येथे संपन्न झाला.

नवी दिल्ली येथे एन. डी. एन. सी कनवेंन्शन सेंटर, संसद मार्ग येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी विविध वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दैनिक मुंबई माणूस रोखठोक, प्रखडपणे वाचकांपर्यंत पोहोचला असून दैनिकाने समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments