गाडी उचलल्यावरुन वाहनधारक,पोलिसात हाणामारी

- Advertisement -

ठाणे : दम्मानी इस्टेट इथल्या गोल्ड जिमसमोरील फूटपाथवरील एका तरूणाची दूचाकी टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी उचलल्यानंतर दुचाकीस्वार पवन पजवानी आणि पोलिस कर्मचारी काशिनाथ मोरे यांच्यात वाद झाला. या प्रकरणी मोरे यांच्या तक्रारीवरुन दुचाकीस्वार पजवानी विरुध्द नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

बाईक टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी दुचाकी उचलली. त्यानंतर तरुणाने त्याची बाईक व्हॅनवरुन खाली खेचण्यास सुरुवात केली.  दंड भरण्यासाठी त्याने दोन हजारांची नोट दिली आणि आताच्या आता पावती देऊन गाडी सोडण्यास सांगितलं. परंतु माझ्याकडे सुट्टे पैसे नाही, बाजूलाच ट्रॅफिक ऑफिस आहे, तिथे पैसे भरुन गाडी घेऊन जा, असं हवालदार मोरे यांनी तरुणाला सांगितलं. यानंतर संतापलेल्या पवन पजवानीने काशिनाथ मोरे यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. ठाण्यामध्ये यापूर्वी पोलिस आणि वाहनधारक यांच्यामध्ये हाणामाऱ्यांच्या घटना घडल्या आहेत.

- Advertisement -