Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादराज्यभर जाळपोळ,तोडफोड!

राज्यभर जाळपोळ,तोडफोड!

मुंबई – पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (१ जानेवारी) किरकोळ वादातून दोन गटांमध्ये दगडफेक आणि वादावादीचा प्रकार घडला होता.  त्याचे पर्यावसन गाड्यांची तोडफोड आणि दगडफेकीमध्ये झाले.भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला २०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने तेथे विजय दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पुण्यातून काही तरुण जात होते. त्यावेळी दोन गट आमने-समाने आल्याने किरकोळ बाचाबाची झाली. पुढे त्याचे पडसाद दगडफेक आणि जाळपोळीत झाले. आज सकाळपासून या सर्व प्रकाराचे लोण राज्यात पसरले आहे. मुंबईसह, सोलापूर, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. १३४ बसेसचे नूकसान झाले.

चेंबूर, सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक रोखून धरली होती.  चेंबूर, गोवंडी येथे रेल रोको झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. हार्बर रेल्वे मार्गावरील स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. काही ठिकाणी बेस्ट बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. चेंबूर, मुलूंड,कुर्ला, गोवंडी परिसरात मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दल आणि 400 अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

चेंबूर अमर महाल, घाटकोपर इथे दगडफेकीच्या घटना घडल्या. भीमा-कोरेगाव हिंसाचारामुळे अहमदनगर, औरंगाबाद येथे जाणारी बससेवा निलंबित करण्यात आली. मुंबईत तणावाची स्थिती निर्माण झाल्याच्या बातम्या आल्यानंतर अनेक कार्यालये लवकर सोडून देण्यात आली. मुंबई पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ईस्टन एक्सप्रेस वे वरील वाहतुकीवर या आंदोलनाचा परिणाम झाला. सोशल मीडियावर काहीही पोस्ट

कऱ्हाडात वाहने, दुकानांची तोडफोड, जमाव आक्रमक, तुफान दगडफेक….

कऱ्हाड : कोरेगाव-भीमा येथील घटनेचे पडसाद मंगळवारी कऱ्हाडात उमटले. जमावाने दुकाने, वाहनांची प्रचंड तोडफोड केली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोरेगाव-भीमा येथे सोमवारी दगडफेक तसेच तोडफोड झाली होती. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.

मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कऱ्हाड शहरात शेकडोंचा जमाव जमला. या जमावाने बसस्थानकासमोरील हॉटेल अलंकारसह अन्य दुकानांवर दगडफेक केली. त्यानंतर जमाव बसस्थानक चौकातून पुढे विजय दिवस चौकाकडे गेला. तेथेही उघड्या दुकानांवर दगडफेक करण्यात आली. विजय दिवस चौकात उभ्या असणाऱ्या प्रवासी वाहतूक रिक्षांवरही जमावाने दगडफेक केली. त्यामध्ये रिक्षांच्या काचा फुटल्या.

उपजिल्हा रुग्णालयासमोरील चौकातून शेकडोंचा जमाव आंबेडकर चौकाकडे गेला. आंबेडकर चौकातच जमावाने ठिय्या मांडला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत कोरेगाव-भीमा येथील घटनेचा निषेध करण्यात आला.

पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. या घटनेमुळे शहरात सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

फलटणमध्ये एसटीवर दगडफेक, एक प्रवासी गंभीर जखमी…

फलटण (सातारा) : जिंती नाका परिसरात पंढरपूरहून मुंबईला निघालेल्या एसटीवर एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. यामध्ये एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.  मंगळवारी सकाळी ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर आगाराची बस (एमएच १४ बीटी ३१११) ही  जिंती नाका येथे आली असता अज्ञाताने दगडफेक केली. यावेळी दगड लागल्याने एसटीतील क्रमाकांच्या दोनच्या आसनावर बसलेला प्रवासी गंभीर जखमी झाला. त्याच्या कानाला दुखापत झाली आहे.

घटनेनंतर जखमी व्यक्तीला तातडीने फलटण येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. एसटीचे अधिकारी व पोलीस घटनास्थळी पोहोचत आहेत. त्यामुळे दगडफेकीचे कारण स्पष्ट झाले नाही.

कोण काय बोलले…..

घटनेची चौकशी न्यायाधीशांमार्फत होणारः मुख्यमंत्री

भीमा कोरेगावप्रकरणी सामाजिक सलोखा राखावा : शरद पवार

शांतता आणि संयम राखा, अशोक चव्हाण यांचे आवाहन

कोठे काय झाले?….

भीमा कोरेगाव प्रकरण : मुंबईत हिंसक पडसाद

सांगलीः मिरजेत ५ एसटी गाड्या फोडल्या

भीमा कोरेगाव प्रकरणी सातार्‍यात आरपीआयच्यावतीने मोर्चा

फलटणमध्ये बसवर दगडफेक, एक गंभीर

नगरः बसस्थानकाबाहेर १५ वाहनांच्या काचा फोडल्या

भीमा कोरेगाव प्रकरणाचे सोलापुरात पडसाद, बस पेटवली

भीमा कोरेगाव पडसाद, दुपारनंतर शाळांना सुट्टी

भीमा कोरेगाव प्रकरणाचे उमरगा, कळंबमध्ये पडसाद

औरंगाबाद : दगडफेकीनंतर जमावबंदी लागू; ३ पोलिस जखमी

भीमा कोरेगावप्रकरणी नाशिक बंद, रास्‍ता रोको

हिंगोली : बसस्थानकाजवळ दोन जीप जाळल्या. वसमत बंदचे आवाहन.
जालना : जालना-सिंदखेड राजा मार्गावरील नंदापूर फाट्यावर बसवर दगडफेक.

वसमत: वसमत बंदचे आवाहन

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments