Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रभीमा कोरेगाव पडसाद: मुंबईतही रेल रोको, बसची तोडफोड

भीमा कोरेगाव पडसाद: मुंबईतही रेल रोको, बसची तोडफोड

मुंबई- भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईमध्येही हिंसक पडसाद उमटले आहेत. कुर्ला, मुलुंड व चेंबूर परिसरात निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईतील चेंबूर स्थानकावर रेल्वे रोको करण्यात आले. मुलुंडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्टेशन रोड परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, येथे राजकीय पक्षांनी मोर्चा काढत मुलुंड पोलीस उपायुक्तांना निवेदन दिले. कुर्ला रेल्वे स्थानक परिसरातही बस फोडण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेनंतर संतप्त आंबडेकरी अनुयायांकडून रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सीएसटीकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती ती आता सुरळीत झाली आहे. जीआरपी पोलीस आणि आरपीएफ जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कोरेगावात भीमाच्या ऐतिहासिक लढाईला दोनशे वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने ऐतिहासिक विजय स्तंभला मानवंदना देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी सणसवाडी परिसरात दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. वाहनांची तोडफोड करण्यात आली. दगडफेकीमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments