Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeविदर्भनागपूरभाजप आमदार आशिष देशमुखचा भाजपला राम-राम?

भाजप आमदार आशिष देशमुखचा भाजपला राम-राम?

महत्वाचे….
१. भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी दिल्लीत घेतली काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट
२. सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात देशमुख होते नाराज
३. भाजपातून देशमुख बाहेर पडणार


नागपूर: भाजपवर नाराज असलेले काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी मंगळवारी रात्री दिल्ली येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत वडील माजी मंत्री रणजित देशमुख हेही उपस्थित होते. या बैठकीत आशिष यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा झाली. यामुळे देशमुख हे भाजपाला लवकरच राम राम करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आशिष देशमुख यांनी उघडपणे भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात ते काटोल येथे उपोषणालाही बसले होते. या नंतर सरकारकडून देशमुखांच्या संस्थांना नोटीसही बजावण्यात आल्या. देशमुख हे भाजपमध्ये अस्वस्थ असून ते सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेत आहे. मंगळवारी रात्री चव्हाण यांच्याशी झालेली भेट त्याच्याच एक भाग होती. मात्र या बैठकीत रणजित देशमुखही उपस्थित असल्यामुळे आता आशिष देशमुख काही तरी अंतिम निर्णय घेतील असे दिसते. मात्र भाजपातून कोणत्या क्षणी ते बाहेर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments