Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेनेला 120 जागा देण्याची भाजपची तयारी

शिवसेनेला 120 जागा देण्याची भाजपची तयारी

युतीमध्ये जागा वाटपावरून अद्यापही एकमत झालेलं नाही. शिवसेना फिफ्टी- फिफ्टीच्या फॉर्म्यूल्यावर अडून बसलेली आहे. मात्र, भाजपला हा फॉर्म्यूला मान्य नाही. परंतु भाजपा सेनेला फक्त 120 जागा देण्याच्या तयारी असल्याची माहिती सुत्रांनी दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत युतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेला 115 ते 120 जागा देण्याबाबत राज्यातील नेत्यांना सुचवलं आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेनेसोबत युती करायची असेल तर किमान 126 ते 128 जागा शिवसेनेला द्याव्या, अशी गळ भाजपच्या राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला घातली आहे.

शिवसेनेला किमान 126-128 जागा दिल्या तरच शिवसेनेशी सन्मानपूर्वक युती होऊ शकेल आणि काही अडथळा येणार नाही असं राज्यातील भाजप नेत्यांचं मत असल्याचं सांगितलं जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या नेतृत्वाने देखील 125 ते 130 जागांमध्ये सन्मानपूर्वक तोडगा काढण्याची प्राथमिक तयारी दर्शवली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ‘मातोश्री’त खलबते झाल्याचंही बोललं जातं. 2 दिवसांपूर्वी रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीस ‘मातोश्री’वर गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुचविलेला जागा वाटपाचा फार्म्युला सांगितला. त्यामुळे युतीमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments