Placeholder canvas
Tuesday, April 16, 2024
Homeदेशबघा Video : भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, महिला उपजिल्हाधिकारीचे ओढले केस!

बघा Video : भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, महिला उपजिल्हाधिकारीचे ओढले केस!

priya warma

राजगढ : जमावबंदीचे आदेश लागू असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी CAAच्या समर्थनार्थ रॅली काढली. या वेळी आंदोलकांना ऱोखल्यामुळे आंदोलक संतप्त झाले. त्यानंतर आंदोलकांनी उपस्थित महिला उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा यांचे केस ओढले. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या राजगढ येथे घडली.

राजगढ जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू होते. तरी ही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी CAAच्या समर्थनार्थ रॅली काढली. त्यामुळे प्रशासन आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. तिरंगा झेंडा हाती घेऊन आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना महिला उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा बाजूला करत होत्या. काही आंदोलकांच्या कानशिलात त्यांनी लगावली. या बाचाबाचीदरम्यात काही आंदोलकांनी प्रिया वर्मा यांचे केस ओढले. त्यामुळे त्या आणखीच संतप्त झाल्या. त्यानंतर पोलिसांना कार्यकर्त्यांवर सौम्य लाढीचार्ज केला.

रॅलीला या कारणामुळे नव्हती परवानगी…

मध्यप्रदेशात भाजपाने CAA च्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन केले होते. त्याचाच भाग म्हणून राजगढमध्ये ही रॅली काढण्यात आली होती. मात्र जिल्ह्यात कलम १४४ लागू होते. त्यामुळे हे कारण देत या रॅलीला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही भाजपा नेत्यांनी रॅली काढणारच, अशी भूमिका घेतली होती. रविवारी हजारोंच्या संख्येने भाजपा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments