Placeholder canvas
Wednesday, April 17, 2024
Homeमहाराष्ट्रबारामतीत अजित पवारांच्या विरोधातील भाजपची खेळी फसली

बारामतीत अजित पवारांच्या विरोधातील भाजपची खेळी फसली

ajit pawar baramati
बारामतीमधून अजित पवारांच्या पराभवासाठी मुख्यमंत्रीदावरून देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देऊन खेळी खेळली होती, परंतु तो डाव उलटा फसला. अजित पवारांची विजयाकडे घौडदौड सुरु आहे.

अजित पवारांनी ५० हजार मतांची आघाडी घेतली असून गोपीचंद पडळकर यांचा पराभव निश्चित मानला जात आहे. २०१४ मध्ये गोपीचंद पडळकर भाजपाच्या तिकीटावर सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. तर २०१९ लोकसभा निवडणूक वंचितकडून सांगलीमधून लढले होते. यावेळी पुन्हा त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यांच्या पक्षप्रवेशावेळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीमधून निवडणूक लढणार का ? अशी विचारणा करत अप्रत्यक्ष उमेदवारी जाहीर केली होती.

बारामतीवर पवार कुटुंबियांचाच दबदबा…

पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघ पवार कुटुंबाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. १९६७ पासून पवार कुटुंबातील व्यक्तीनेच विधानसभेत बारामतीचे प्रतिनिधीत्व केले आहे. १९६७ ते १९९० शरद पवार आणि त्यानंतर अजित पवार सातत्याने या मतदारसंघातून निवडून येत आहेत. मागच्या ५० वर्षात बारामतीमध्ये कुठलाही पक्ष पवार कुटुंबासमोर आव्हान उभा करु शकलेला नाही हे विशेष.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments