Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकांदिवली प्रभाग क्रमांक २१ च्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपची बाजी

कांदिवली प्रभाग क्रमांक २१ च्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपची बाजी

मुंबई – कांदिवली प्रभाग क्रमांक २१ च्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या प्रतिभा गिरकर ७१२२ मतांनी विजयी झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने भाजपला पाठींबा दिला होता.

भाजपच्‍या तत्‍कालीन नगरसेविका शैलजा गिरकर यांचे निधन झाले होते. यामुळे प्रभाग क्रमांक २१ ची जागा रिक्त झाली होती. पोटनिवडणुकीमध्ये शैलजा गिरकर यांच्या सुनबाई प्रतिभा गिरकर यांना भाजपने उमेदवारी दिली होती. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने निलम विशाल मधाळे (मकवाणा) यांना उमेदवारी दिली होती. प्रतिभा गिरकर यांच्या पारड्यात ९५९१ मते पडली तर  निलम मधाळेंना १९८४ मते मिळाली.
या पोटनिवडणूकीत २८.७५ टक्के इतके मतदान झाले. या निवडणुकीसाठी ६ हजार ६३१ पुरुष व ५ हजार १७३ स्त्रिया‍‍ असे एकूण ११ हजार ८०४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजाविला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments