तावडेंच्या बंगल्याबाहेर लावला काळा आकाश कंदिल

- Advertisement -

मुंबई– शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आज राज्याच्या शिक्षण धोरणाचा निषेध करण्यासाठी विनोद तावडेंच्या बंगल्याबाहेर काळा कंदिल लावला. यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले आहे.

शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आज राज्याच्या शिक्षण धोरणाचा निषेध करण्यासाठी विनोद तावडेंच्या बंगल्याबाहेर काळा कंदिल लावला. तावडेंच्या बंगल्याबाहेर काळा कंदिल लावल्यानंतर कपिल पाटील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर काळा कंदिल लावण्यासाठी निघाले होते. पण त्यापूर्वीच पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले. शिक्षकांचे पगार मुंबई बँकेत जमा करण्याला कपिल पाटलांचा विरोध आहे. तसेच रात्र शाळा बंद केल्यामुळे अनेकांची दिवाळी अंधारात गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

- Advertisement -