Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रबजेट देशासाठी पाहिजे निवडणुकांसाठी नको – उद्धव ठाकरे

बजेट देशासाठी पाहिजे निवडणुकांसाठी नको – उद्धव ठाकरे

budget-2021-budget-is-for-the-country-not-for-elections-cm-thackeray
budget-2021-budget-is-for-the-country-not-for-elections-cm-thackeray

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी आज (सोमवार 1 फेब्रवारी) केंद्रीय अर्थसंकल्प  मांडला. त्यानंतर यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. सत्ताधारी नेते मंडळींकडून या अर्थसंकल्पाचे कौतुक केले जात आहे. तर, विरोधी पक्षांनी यावर टीका करणं सुरू केलं आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी देखील माध्यमांना थोडक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली.

” बजेट देशासाठी पाहिजे निवडणुकांसाठी नको. हा देशाचा अर्थसंकल्प आहे निवडणुकांचा नाही. थोडासा अवधी घेऊन मी अर्थसंकल्पावर व्यवस्थित बोलणार आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पश्चिम बंगाल, केरळ व दक्षिणेकडील राज्यांसाठी या अर्थसंकल्पात मोठ्याप्रमाणावर तरतूद केल्या गेल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

धक्कादायक: पोलिओ डोसऐवजी सॅनिटायजर पाजले

तर, ” हा अर्थसंकल्प देशाचा आहे, देशासाठी आहे की एखाद्या राजकीय पक्षाचा आहे? निधी वाटपाचा. ज्या प्रमाणे निवडणुकीसाठी निधी वाटतात, तसं काही हे राष्ट्रीय कोषातून निवडणुकांसाठी निधी वाटप सुरू आहे का? असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होऊ शकतो.

काही राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर कुणी बजेट मांडत असेल. तर त्याला देशाचं बजेट म्हणू नये, एका राजकीय पक्षाचं बजेट म्हणावं.” अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या अगोदर मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments