केंद्राने सर्व डाळींवरील निर्यातबंदी हटवली!

- Advertisement -

महत्वाचे…
१.आपला देश डाळ उत्पादनात पहिल्या क्रमांकावर,२. डाळ खाण्यात पहिल्या क्रमांकावर ३. डाळ आयात करण्यातही आपला देश पहिल्या क्रमांकावर


मुंबई : केंदीय मंत्रिमंडळाने सर्व डाळींच्या निर्यातींवरचे प्रतिबंध हटवले आहेत. देशभरात डाळींचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये तूर, मूग आणि उडीद निर्यातीवरचे निर्बंध हटवले होते. आता सर्व प्रकारच्या डाळींचा त्यात समावेश आहे.

- Advertisement -

आपल्या देशाची गरज अंदाजे २ कोटी २० लाख टन डाळ इतकी आहे, गेले काही वर्ष आपलं उत्पादन १ कोटी ८० लाख ते १ कोटी ९० लाख टन या दरम्यान रेंगाळतंय. मात्र यंदा २ कोटी ३० लाख टन डाळ उत्पादनातून मिळणार आहे.

कशी शिजणार डाळ?

आपला देश डाळ उत्पादनात पहिल्या क्रमांकावर, डाळ खाण्यात पहिल्या क्रमांकावर आणि डाळ आयात करण्यातही आपला देश पहिल्या क्रमांकावर आहे.

देशांतर्गत उत्पादन जास्त झालं असल्यामुळे निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे.. जवळपास सात वर्षांनंतर निर्यातीची परवानगी मिळाली आहे.

कडधान्य किंवा डाळवर्गीय पिकात वाटाणा, हरभरा, काबुली चना, तूर, मूग, उडीद, मसूर ही महत्वाची पिकं आहेत.

एकूण कडधान्य उत्पादनात सर्वात जास्त मटार म्हणजेच वाटाण्याचा (Peas) त्यानंतर तुरीचा वाटा, आयातीमध्येसुद्धा सर्वात जास्त मटार म्हणजेच वाटाणा आयात करतो त्याखालोखाल मसूर मग मूग-उडदाचा क्रमांक, त्यानंतर तूर आयात होते.

डाळ कोणत्या देशातून आयात होते?

  • तूर – म्यानमार, टांझानिया, मोझांबिक, मलावी (पूर्व आफ्रिका)
  • मूग – म्यानमार, टांझानिया, मोझांबिक, ऑस्ट्रेलिया
  • मसूर – कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया
  • मटार – कॅनडा, रशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया
  • हरभरा – रशिया, ऑस्ट्रेलिया
- Advertisement -