विधानपरिषदेत पाठिंब्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटील मातोश्रीवर!

- Advertisement -

मुंबई: ७ डिसेंबरला होणाऱ्या विधानपरिषद निवडणूकीसाठी भाजपा उमदेवार देणार आहे. या उमदेवाराला शिवसेनेने मदत करावी यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे हे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या भेटसाठी मातोश्रीवर गेले आहे.

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे विधानपरिषद पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपने अन्य उमेदवार दिल्यास शिवसेना या उमेदवाराला पाठिंबा देवू शकते त्यामुळे अन्य पक्षाची मदत न घेता भाजपचा उमेदवार विजयी होवू शकतो. म्हणून भाजप-शिवसेनेत वाटाघाटीही सुरु झाल्या आहेत. या भेटीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा सुरू असल्याचे समजते.

शिवसेनेचा राणेंच्या उमेदवारीला प्रचंड विरोध आहे, त्यामुळे भाजपने उमेदवार दिल्यास शिवसेनेच्या पाठिंब्याने सहज विजय मिळू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दुरध्वनीवरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आज चंद्रकांत पाटील आणि तावडे यांनी मातोश्रीवर जावून चर्चेसाठी गेले आहेत. राणे यांच्या नावाची चर्चा मावळल्याने भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, शायना एनसी आणि राष्ट्रवादीतून भाजपात आलेले प्रसाद लाड यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

- Advertisement -
- Advertisement -