Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार परिचारक विरुध्द विधानसभेत गदारोळ!

आमदार परिचारक विरुध्द विधानसभेत गदारोळ!

महत्वाचे…
१.विधान भवन पायऱ्यांवर शिवसेना आमदारांनी जोरदार घोषणाबाजी
२.परिचारक यांना बडतर्फ करण्याची मागणी
३. कामकाज दिवसभरासाठी तहकूब


मुंबई भाजपाचे सह्योगी आमदार प्रशांत परिचारक यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. परिचारक यांना कायमस्वरुपी बडतर्फ करावे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी शिवसेना आमदारांनी सोमवारी गदारोळ घातला. यासाठी विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान गेल्या वर्षी पंढरपूर येथे आ. प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीविषयी अपमानास्पद उद्गार काढले होते. त्यानंतर ९ मार्च २०१७ रोजी परिचारक यांना दीड वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. परिचारक यांचे निलंबन रद्द करण्याचा ठराव गेल्या आठवड्यात बुधवारी चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत मांडला होता. हा ठराव बहुमताच्या जोरावर मंजूर देखील करण्यात आला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर शिवसेना आमदार याविरोधात आक्रमक झाले आहेत. परिचारक यांचे निलंबन मागे घेतले यासारखी शरमेची बाब नाही. परिचारक यांना विधिमंडळाच्या आवारात पायसुद्धा टाकू देऊ नका, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. सोमवारी कामकाज सुरु होताच शिवसेना आमदारांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली होती. विधान भवन पायऱ्यांवर शिवसेना आमदारांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments