महिला कॉन्स्टेबल लिंग बदल प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप

- Advertisement -

महत्वाचे…
१.दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण असल्याने नियमात तरतूद करुन सेवेत रुजू करुन घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन २. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी तिनं लिंग बदलण्यासाठी सुट्टीचा अर्ज केला ३. माजलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याच प्रकरण


बीड : बीडमधील महिला कॉन्स्टेबलने लिंग बदल करुन पुन्हा सेवेत रुजू करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला आहे. या प्रकरणात सहानुभूतीपूर्वक विचार करुन निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक आणि गृह विभागाला दिल्या आहेत. दुर्मिळात दुर्मिळ प्रकरण असल्याने नियमात तरतूद करुन सेवेत रुजू करुन घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

माजलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका महिलेनं महिन्याभरापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी एक महिन्याची रजा आणि त्यानंतर पोलिस दलात पुन्हा पुरुष पोलिस म्हणून रुजू करुन घेण्याची मागणी केली होती. हा विषय अधीक्षकांच्या अखत्यारित नसल्यामुळे त्यांनी तिचा अर्ज पोलिस महासंचालक सतिष माथूर यांच्याकडे पाठवला. मात्र आता महासंचालकांनी ही परवानगी नाकारली आहे. लिंगबदल करुन सेवेत रुजू करुन घेण्यासाठी कोणताच नियम नसल्याचं पत्रात म्हटल्याची माहिती आहे.

- Advertisement -

२३ जून रोजी मुंबईतल्या जेजे रुग्णालयात या महिला कॉन्स्टेबलची हार्मोन आणि शारीरिक चाचणी झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी तिनं लिंग बदलण्यासाठी सुट्टीचा अर्ज केला होता. या प्रकरणी सध्या पोलिस दलात बरीच चर्चा सुरु असुन या प्रकरणी काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisement -