वळसेंच्या एकसष्ठी कार्यक्रमाला पवारांसह मुख्यमंत्री, गडकरींचीही हजेरी

- Advertisement -

मुंबई – दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्ठीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, शरद पवार, अशोक चव्हाण, रामदास आठवले यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी दिलीप वळसे यांच्या वाटचालीवर गौरवग्रंथाचे देखील प्रकाशन करण्यात आले. रामदास आठवले यांच्या काव्यात्मक आणि व्यंगात्मक शुभेच्छांनी उपस्थित नेत्यांसह संपुर्ण सभागृहात हशा पिकला.

अशोक चव्हाण यांनी दिलीप वळसे यांच्याबद्दल बोलताना दिलीप वळसेंच्या विधानसभेतील उत्कृष्ट कामाचा उल्लेख करत कौतुक केले. या प्रसंगी बोलताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. दिलीप वळसे यांनी आपल्या सत्कार कार्यक्रमात बोलताना त्यांच्या जडणघडणीतील अनेक मान्यवरांचा उल्लेख केला. वडिलांमुळे राजकारणाची आवड निर्माण झाल्याचेही त्यांनी नमुद केले. तसेच शरद पवार यांनी राजकारणात संधी दिल्याचेही त्यांनी सांगितले. याबरोबरच पवार यांच्यासोबत राजकारणाच्या प्रवासातील अनेक आवठणींना आणि काही दुखद आठवणींनाही वळसे यांनी उजाळा दिला.

- Advertisement -