मुख्यमंत्र्यांनी गृहखातं दुसऱ्याकडे द्यावं- बाळा नांदगावकर

- Advertisement -

महत्वाचे…
१.भाजपा जशी वाढत आहे, तशी गुन्हेगारी वाढत आहे २. पोलिस दलात गुन्हेगारी वाढली आहे ३. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी घेतली अनिकेतच्या कुटुंबियांची भेट


सांगली : मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अनिकेतच्या कुटुंबियांची भेट घेतली. अनिकेत कोथळी खून प्रकरणावरून, गृहखात्यावर नियंत्रण राहिले नसल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते सोडावे, आणि दुसऱ्याकडे गृहखाते द्यावे, भाजपा जशी वाढत आहे, तशी गुन्हेगारी वाढत आहे, कारण सगळे वाल्हे हे भाजपामध्ये गेले आहेत.

गुन्हेगारी वाढल्याचा आरोप

- Advertisement -

पोलिस दलात गुन्हेगारी वाढली आहे, अनिकेतच्या खुनाचा कटात सहभागी असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करावी, या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, असं माजी गृहराज्यमंत्री मनसे नेते बाळ नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

राज्याच्या इतिहासाला काळीमा फासला

पोलिस दलातील हैवानांनी राज्याच्या इतिहासाला काळीमा फासला. गृहमंत्री आर. आर. पाटील असताना अशा घटना घडल्या नाहीत. पोलिस दलातीत विकृती संपविण्यासाठी आमुलाग्र बदल करण्याची गरज असल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -