Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeविदर्भनागपूरएमपीएससी विदयार्थ्यांच्या मागण्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे – गटनेते जयंत पाटील

एमपीएससी विदयार्थ्यांच्या मागण्यांमध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे – गटनेते जयंत पाटील

नागपूर– महाराष्ट्रामध्ये दरवर्षी १० ते १५ लाख विदयार्थी एमपीएससी परिक्षेला बसत असून या विदयार्थ्यांसमोर अनेक समस्या आणि नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत त्यामुळे राज्यसरकारने यामध्ये त्वरीत लक्ष घालावे अशी मागणी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे सभागृहात केली.

या विदयार्थ्यांच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि जिल्हापातळीवरील सर्व पदांची प्रतिक्षा यादी त्यांनी लावावी,बोगस विदयार्थीमुक्त परीक्षेसाठी बायोमेट्रीक पध्दतीने विदयार्थ्यांची हजेरी घेतली पाहिजे,तलाठी पदासाठी परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतली पाहिजे,त्याबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तामिळनाडूप्रमाणे पॅटर्न राबवला पाहिजे,बोगस अधिकारी आणि कर्मचारी असतील त्याठिकाणी ( एक रॅकेट नांदेड जिल्हयामध्ये उघड झाले) तसेच कुठे असतील तर त्याची चौकशी करण्यासाठी समिती किंवा आयोग नेमावा आणि ज्यापदासाठी उमेदवारांची निवड होते. अशा उमेदवारांसाठी नियमावली तयार करण्यात यावी.पीएसआय,एसटीआय,आणि एएसओ या पदासाठी एकच मुख्य परीक्षा घ्यावी.पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये जे प्रश्न चुकत आहेत ते टाळण्यासाठीपण एक समिती तयार करावी अशा अनेक मागण्या आहेत. याबाबत गटनेते जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांकडे या मागण्यांकडे लक्ष वेधले आणि लक्ष घालण्याची आग्रही मागणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments