Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रMPSC पूर्व परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!;म्हणाले...

MPSC पूर्व परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!;म्हणाले…

cm-uddhav-thackeray-announce-mpsc-prelim-exam-in-a-week-after-statewide-protest
cm-uddhav-thackeray-announce-mpsc-prelim-exam-in-a-week-after-statewide-protest

मुंबई: गुरुवारी MPSC च्या परीक्षा पुढे ढकल्यामुळे राज्यात गोंधळ निर्माण झाला होता. परीक्षार्थी आंदोलन करत होते, त्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असून येत्या आठ दिवसांच्या आत MPSC ची पूर्व परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्या तारखेची घोषणा १२ मार्च म्हणजे शुक्रवारी जाहीर केली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे.

पुण्यासह राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये सकाळपासून आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात का असेना, पण दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या आठ दिवसांत परीक्षा होतील हे वचन देतो, असं देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

वयोमर्यादा आडवी येणार नाही!

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विद्यार्थ्यांना अजून एक दिलासा दिला आहे. MPSC ची पूर्वपरीक्षा अनेकदा पुढे ढकलल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वयोमर्यादा उलटून जाण्याची भिती वाटू लागली आहे. त्यानंतर परीक्षा देताच येणार नाही, याची देखील चिंता विद्यार्थ्यांना आहे. मात्र, फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. परीक्षा देताना विद्यार्थ्यांना वयोमर्यादा आडवी येणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांनाच काम देणार!

परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांनाच परीक्षेच्या कामांची जबाबदारी दिली जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं. “उगीच कुणी भडकवतंय म्हणून भडकून जाऊ नका. आपला अभ्यास करत राहा. या परीक्षेला शासकीय यंत्रणा लावावी लागते. त्यामध्ये अनेक कर्मचारी गुंतलेले असतात.

या कर्मचारी वर्गाची तयारी करून घ्यावी लागणार आहे. करोना वाढताना विद्यार्थ्यांसोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही टेस्ट करावी लागणार आहे. ज्यांना लसीकरण केलं असेल, अशाच कर्मचाऱ्यांना परीक्षेसंदर्भातल्या ड्युटीवर लावलं जाणार आहे”, असं ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments