Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रदोषी कुठल्याही जाती, धर्माचे असोत कठोर कारवाई करा - सकल मराठा क्रांती...

दोषी कुठल्याही जाती, धर्माचे असोत कठोर कारवाई करा – सकल मराठा क्रांती मोर्चा

मुंबई – मूळ प्रकरण अनेक प्रकारे रंगवून सांगितलं त्यामुळे परिस्थिती बिघडली. भीमा कोरेगाव प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या सूत्रधारांचा शोध घ्यावा. दोषी कुठल्याही जाती, धर्माचे असोत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. झालेल्या हिसांचाराचा आम्ही निषेद करतो, बहुजन समाजाचा भावनांचा आम्ही आदर करतो असेही मराठा क्रांतीच्या वतीनं जाहिर करण्यात आलं. 

भीमा-कोरेगाव दोन गट समोरासमोर येणार नाहीत याची पोलिसांनी काळजी घ्यायला हवी होती. भीमा कोरेगावच्या घटनेला पोलीस जबाबदार असल्याचा आरोपही सकल मराठी क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी यावेळी करण्यात आला.

सकल मराठा क्रांती मोर्चाच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे – 

  • मूळ प्रकरण अनेक प्रकारे रंगवून सांगितलं त्यामुळे परिस्थिती बिघडली
  • दोषी कुठल्याही जाती, धर्माचे असोत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे
  • दलित समाजाच्या भावनांशी समरस आहोत
  • भीमा कोरेगाव घटनेला पोलीस प्रशासन जबाबदार

भीमा कोरेगाव प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments