Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रपैसे वाटल्याची कबुली देणा-या लोणीकरांची उमेदवारी रद्द करा: काँग्रेस

पैसे वाटल्याची कबुली देणा-या लोणीकरांची उमेदवारी रद्द करा: काँग्रेस

काँग्रेसच्या रत्नाकर महाजन यांची मुख्य निवडणूक अधिका-यांकडे तक्रार

Congress demands cancellation of Babanrao Lonikar's candidature
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे मंत्री व परतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांनी प्रचारसभेत भाषण करताना “आपण सर्व तांड्यांवर पैसे वाटलेले असल्याने आपल्याला निवडून येण्याची चिंता नाही” असे वक्तव्य केले आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोणीकरांची उमेदवारी रद्द करण्यात यावी. अशी मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष, प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.

महाजनांनी तक्रारीत सांगितले की, लोणीकर मते मिळवण्यासाठी ते विशिष्ट जातीचा उल्लेख करत आहेत. यावरून निवडणूक जिंकण्यासाठी ते भ्रष्ट मार्गांचा अवलंब करत आहेत. हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे बबनराव लोणीकर यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दखल करून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments