Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमराठवाडानांदेडकाँग्रेसचे गुरुवारी नांदेड येथे विभागीय शिबीर,जाहीर सभा

काँग्रेसचे गुरुवारी नांदेड येथे विभागीय शिबीर,जाहीर सभा

नांदेड: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या  पूर्व तयारीस काँग्रेस पक्ष लागला असून त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उत्साह भरण्यासाठी १९ एप्रिल रोजी नांदेड येथे  काँग्रेस पक्षाचे मराठवाडा पातळीवरील  विभागीय शिबीर आणि जाहीर सभा होणार आहे.

भक्ती लॉन्समध्ये काँग्रेस पक्षाचे विभागीय शिबीर सकाळी १०.०० वाजता, सायंकाळी ६.०० वाजता नवा मोंढा मैदानावर काँग्रेस पक्षाची भव्य जाहीर सभा होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मुख्यमंत्री  व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण हे राहणार आहेत.

पहिल्या सत्राची सुरुवात सकाळी १०.०० वाजता होणार आहे. तर दुसरे सत्र दुपारी २.३० वाजता सुरु होवून सायंकाळी ५.३० वाजता शिबिराची सांगता होणार आहे. विभागीय शिबिरानंतर सायंकाळी ६.०० वाजता नवा मोंढा मैदानावर काँग्रेस पक्षाची भव्य जाहीर सभा होणार आहे. हे शिबीर केवळ निमंत्रितांसाठीच असून मराठवाडयातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, मजूर फेडरेशन, बाजार समित्या यामधील काँग्रेस पक्षाचे विद्यमान सदस्य तसेच पक्ष संघटनेतील ब्लॉक ते राष्ट्रीय पातळीवरील मराठवाडयातील काँग्रेस पदाधिकार्‍यांचा यामध्ये समावेश असणार आहे.

भक्ती लॉन्स येथे होणार्‍या शिबिरास महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पायलट, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. राजीव सातव, खा. कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, माजी मंत्री आ. नसीम खान, आ. वर्षा गायकवाड, आ. यशोमती ठाकूर, आ.बस्वराज पाटील, आ.अब्दुल सत्तार, आ. मधुकर चव्हाण, आ. दिलीपराव देशमुख, आ. हर्षवर्धन  सपकाळ, आ. डी.पी.सावंत, आ. सौ. अमिता चव्हाण, आ. वसंतराव चव्हाण यांच्यासह मराठवाडयातील सर्व काँग्रेस आमदारांची उपस्थिती लाभणार आहे.

सुप्रसिध्द शायर इम्रान प्रतापगढी यांची उपस्थिती….

नवामोंढा येथे होणार्‍या जाहीर सभेस उपरोक्त सर्व मान्यवरांसह सुप्रसिध्द शायर इम्रान प्रतापगढी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तरी भक्ती लॉन्स येथे होणार्‍या  शिबिरास निमंत्रितानी तर नवा मोंढा मैदानावरील जाहीर सभेस सर्व काँग्रेस कार्यकर्ते व  नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर व जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments