काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची राहत्या घरी आत्महत्या

- Advertisement -

Mahadev Shelar, Congress Spokesperson, Congress, MRCC

काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे. महादेव शेलार यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचं समजतं आहे. शेलार यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुलुंडमधील राहत्या घरी महादेव शेलार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना मुलुंडमधील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, पंचनामा सुरू असून घाटकोपरमधील राजावाडी हॉस्पिटलमध्ये महादेव शेलार यांचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आला आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

- Advertisement -
- Advertisement -