कोपर्डी बलात्कार,खून खटला: आज पासून शिक्षेवरचा युक्तीवाद

- Advertisement -

अहमदनगर: सगळ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यात आज पासून शिक्षेवर युक्तीवाद होणार आहे. शनिवारी या प्रकरणात तिघांना दोषी करार देण्यात आला होता.

जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही आरोपींना कोर्टानं दोषी ठरवले. यातील   नितीन भैलूमे याचे वकील प्रकाश आहेर आज २१ नोव्हेंबर २०१७ पासून ११ वाजेपासून युक्तिवाद सुरू होणार आहे. त्यानंतर मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे व संतोष भवाळ यांचे वकील अड. योहान मकासरे युक्तिवाद करतील. त्यानंतर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद होईल. अहमदनगरच्या सत्र न्यायालयात आज अहेर शिक्षेवर युक्तीवाद करतील. बलात्कार, खून, गुन्हेगारी कट रचणे आणि अन्य गुन्हे  दोषींवर सिद्ध झाले आहेत. या खटल्यात वैद्यकीय पुरावे महत्वाचे ठरले, असा निर्वाळा कोर्टानं दिला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या खटल्यात सरकारची बाजू मांडली.

१३ जुलै २०१६ रोजी नगरच्या कोपर्डी गावात नववीत शिकणाऱ्या मुलीवर तिन्ही दोषींनी बलात्कार केला, त्यानंतर अतिशय निर्घृण पद्धतीनं तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती.

- Advertisement -

कोपर्डीचा घटनाक्रम

१३ जुलै २०१६ – नववीत शिकणाऱ्या मुलीची बलात्कार करून निर्घृण हत्या

१४ जुलै २०१६ – गावातील आरोपी जितेंद्र शिंदेला अटक

१६ जुलै २०१६ – संतोष भवाळ, नितीन भैलुमेला अटक

७ ऑक्टो २०१६ – न्यायालयात आरोपपत्र दाखल

२० डिसें २०१६ – पहिला साक्षीदार तपासला

२४ मे २०१७ – शेवटचा साक्षीदार तपासला

४ सप्टें. २०१७ – बचाव पक्षाकडून एक साक्षीदार नोंदवला

२६ ऑक्टो २०१७- अंतिम युक्तिवादाला सुरुवात

८ नोव्हें २०१७ – अंतिम युक्तिवाद पूर्ण

१८ नोव्हेंबर – तिन्ही आरोपींना दोषी करार

- Advertisement -