राज्यात दिवसभरात १११ रूग्णांचा मृत्यू,३५ हजार ९५२ कोरोना रुग्ण सापडले

- Advertisement -
coronavirus-111-patients-deth-in-a-day-in-the-maharashtra
covid-19-maharahtra-report-27126-new-cases-reported-today-on-20-march-2021-check-district-wise-report

मुंबई: राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. आज दिवसभरात राज्यात १११ रूग्णांचा मृत्यू  झाला तर ३५ हजार ९५२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण २,६२,६८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज २० हजार ४४४ रुग्ण देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २२,८३,०३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८७.७८ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८८,७८,७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,००,८३३ (१३.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,६२,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,७७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -
- Advertisement -

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here