Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रधक्कादायक : डहाणूत २५ गाईंचा मृत्यू!

धक्कादायक : डहाणूत २५ गाईंचा मृत्यू!

dahanu-25-dead-cows-found-in-the-ground-near-matgaon पालघर : डहाणू तालुक्यातील माटगाव गावाच्या शिवारात २५ गाईंचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली. गुरांनी शेतात कीटकनाशक फवारलेला गवत – चारा खाल्ला असेल त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत गाईंचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गाईंचा कोणी मालक नाही. मात्र मृत्यू कशामुळे झाला असावा हे शवविच्छेदनानंतरच समजणार आहे.

डहाणू मध्ये माटगाव गावाच्या परिसरांतील शेतात, गवतात २५ मृत गाई आढळल्या. या मोकाटगाई असल्याने त्यांना कोणी मालक नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला असावा, हे शवविच्छेदनानंतरच समजणार आहे. अद्यापी शोधकार्य सुरू आहे. माटगावच्या आसपास प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, मिरची बागायती आहेत. त्यांत भाजीपाला किंवा अन्य पिकांची लागवड केली जाते. रात्रीच्या मोकाट गाईंचा तांडा कुंपण तोडून किंवा उड्या मारून बागेत घुसतात आणि संपूर्ण बागच्या बाग फस्त करून टाकतात. त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान होते.

बागायतदार एखाद्या वांग्यात अथवा भाजीपाल्यात थायमेटसारखे कीटकनाशक भरून, बागेच्या बाहेर लांबवर फेकून देतात. ती खाऊन गुरे मरतात. अशी शक्यता आहे. काही बागायतदार भाजीपाला लागवडीवर कीटकनाशकांची फवारणी करतात. हा भाजीपाला गुरांनी खाल्या असावा अशीही चर्चा सुरु आहे.

मृत गाईंच्या विल्हेवाटीसाठी खड्डे खोदण्याकरता, जेसीबी मशीनही मागविण्यात आले आहे. त्यामुळे शोध कार्य पूर्ण झाल्यावरच, मृत गाईंचा निश्चित आकडा समजू शकणार आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments