Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्‍ट्रचेन्नईतील ‘त्या दोन’ मुलांच मृतदेह सापडेना!

चेन्नईतील ‘त्या दोन’ मुलांच मृतदेह सापडेना!

Pune, Three Childernपौड : मुळशीत उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या चेन्नई येथील तीन शाळकरी मुलांचा धरणात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी ( ता.२५ ) रोजी कातरखडक धरणावर फिरण्यासाठी गेली असता तिघे जण पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. एक मृतदेह सापडला असून बाकीचे दोन मृतदेह शोधण्याचे कार्य गुरुवारी सकाळपासून सुरु झाले आहेत.

डॅनिश राजा (वय १३), संतोष के. (वय १३), सर्वान्ना (वय १३ ) असे धरणात बुडालेल्यांची नावे आहेत. यातील डॅनिश राजा याचा मृतदेह सापडला असून बाकी दोघांचा शोध सुरु आहे. शोध कार्य रात्री उशिरा थांबवले. गुरुवारी सकाळी लवकरच शोधकार्यास सुरुवात झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील ए. सी. एस मॅट्रिक्युलेशन शाळेचे विद्यार्थी शिबिरासाठी मुळशी मधील कातरखडक या गावी जॅकलिन स्कूल ऑफ थॉट या ठिकाणी आलेले होते.
आठ दिवस हे शिबीर येथे घेण्यात येणार होते. यासाठी १३-१५ वयोगटातील २० विद्यार्थी या ठिकाणी आलेले होते. त्यांच्यासोबत एक शिक्षक तर तीन शिक्षिका असे चार जण सोबत आलेले आहेत. येथून जवळच असलेल्या कातरखडक या धरणावर सर्वजण फिरायला गेले असता वरील तिघेजण पाण्यात उतरले असता त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच गावातील मंडळी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुळशीचे तहसीलदार यांनी मुलांच्या कुटुंबियांना कळवण्यास सांगितले असून मृतदेह शोधण्याचे काम सुरु केले. सायंकाळपर्यंत शोधकार्य सुरु होते. डॅनिश राजा या मुलाचा मृतदेह सापडला असून शवविच्छेदनासाठी छोट्या मुलांच्या अशा दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments