Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रअंजिठा-वेरूळ लेण्यांचा प्रतिष्ठित पर्यटन स्थळ म्हणून विकास

अंजिठा-वेरूळ लेण्यांचा प्रतिष्ठित पर्यटन स्थळ म्हणून विकास

नवी दिल्ली : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अंजिठा-वेरुळ लेण्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यात येत आहेत.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने देशातील 12 क्लस्टरमधील एकूण 17 पर्यटनस्थळ प्रतिष्ठित पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची योजना आखली आहे. यात महाराष्ट्रातील अंजिठा-वेरुळ लेण्यांसह उत्तर प्रदेशातील ताजमहल व फतेहपूर शिक्री, दिल्लीतील हुमायु मकबरा, लाल किल्ला आणि कुतुब मिनार आदी 17 पर्यटन स्थळांचा समावेश आहे.

केंद्र शासनाचे विविध विभाग, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयातून प्रतिष्ठित पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत पर्यटन स्थळांना रस्ते व हवाई मार्गांनी जोडून उत्तम संपर्क व्यवस्था निर्माण करणे, पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करुण देणे, कौशल्य विकास, स्थानिक लोकांचा सहभाग वाढविणे, पर्यटन स्थळांची ब्रँडींग करुन खाजगी गुंतवणूक आकर्षित करण्यात येणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments