Placeholder canvas
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस शिवतिर्थावर आले, माध्यमांशी न बोलता निघून गेले

देवेंद्र फडणवीस शिवतिर्थावर आले, माध्यमांशी न बोलता निघून गेले

Devendra Fadnavis came to Shivaji Park , left without talking to the media
Image: ANI

मुंबई : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजीपार्क येथे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊन आदरांजली वाहिली. त्यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे हे दोन्ही नेते उपस्थित होते. येथे पत्रकारांनी फडणवीसांशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु फडणवीस माध्यमांशी काही न बोलता निघून गेले.

भाजप शिवसेनामध्ये सत्तेच्या समसमान वाटपावरून संघर्ष झाला. शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतला. त्यामुळे आज भाजपचे नेते बाळासाहेब ठाकरेंच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त येणार आहेत की नाही याचीच चर्चा सुरु होती. सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीटरवरून बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली. यावेळी बाळासाहेबांना आदरांजली वाहताना फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या आठवणींचा एक व्हिडिओ शेअर केला. यासह बाळासाहेबांविषयी असलेल्या भावनाही त्यांनी यामधून व्यक्त केल्या आहेत. बाळासाहेबांनी स्वाभिमान आणि हिंदूत्तवाचा बाणा कधीच सोडू नका असा संदेश दिला होता. याची आठवण या व्हिडिओमधून वारंवार करुन देण्यात आली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शिवसेनेला ही आठवण फडणवीसांनी मुद्दाम करु दिल्याच्या चर्चा सुरू आहेत.

दुपारी फडणवीस बाळासाहेबांच्या समाधीस्थळी आले त्यावेळी शिवसेना जिंदाबादच्या घोषणा लावण्यात आल्या. फडणवीस आले त्यावेळी शिवसेनेचा बडा नेता कोणीही नव्हता. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थितीत होते. फडणवीस बाळासाहेबांना आदरांजली वाहून शिवतीर्थावर न थांबता निघून गेले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments