Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसट्टा बाजारात मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनाच पसंती

सट्टा बाजारात मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनाच पसंती

Devendra Fadnavis is the favorite for the CM in the speculative market
मुंबई : सट्टा बाजारात महायुतीवरच सर्वाधिक सट्टा लागला आहे. लोकसभेतही भाजपवरच मोठ्या प्रमाणात सट्टा लागला होता. मुख्यमंत्री कोण होणार यावरही सट्टा लागला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यांनाच सर्वांत कमी दहा ते पन्नास पैसे भाव लावण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी तयार होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये शिवसेनेचे विधीमंडळाचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला सट्टा बाजार जास्त 1 ते 20 रुपये लावले जात आहेत.

राज्यात विधानसभेसाठी मतदान झाल्यानंतर वेगवेगळे ‘एक्झिट पोल’ आले होते त्यामध्ये महायुती दोनशे जागांच्या पुढे जाईल, असे सांगितले गेले होते. सट्टा बाजारातदेखील महायुतीच्या बाजूने कौल मिळाला होता. आता मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना भाजपामध्ये वाद सुरु आहे तरी सुध्दा सर्वात कमी भाव देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला मिळाला आहे.

भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन होईल आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. त्यामुळे त्यांच्या नावाला सर्वात कमी भाव मिळत आहेत.

सट्टा बाजारातील संजय धनी यांनी सांगितले की, पहिल्यांदा महाराष्ट्राच्या सट्टा बाजारात एक रुपयापासून 1 लाख रुपयापर्यंत लावण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या सट्टा बाजारात वेगळाच प्रकार दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ऑफलाइन व ऑनलाइन सट्टा बाजार तेजीत आहे. निवडणुकीची मतदान प्रक्रिया जवळ येईपर्यंत सट्टाबाजार बदलत आहे. कारवाईच्या भीतीने या वेळी ऑफलाइन सट्टा घेण्यात आला नाही, असेही सट्टा बाजारातील व्यक्तींनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments