धनगर आरक्षणाचा निर्णय पुन्हा लटकला

- Advertisement -

नागपूर: डिसेंबरनंतर धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. नागपुरातल्या धनगर आरक्षण निर्णायक परिषदेत ते बोलत होते. धनगर आरक्षणाचा टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल येत्या डिसेंबर महिन्यात मिळेल. त्या अहवालाच्या आधारे केंद्राकडं आरक्षणासाठी पाठपुरावा केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय पुन्हा लटकण्याची शक्यता आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देणार असल्याचीही घोषणा केली. मागच्या सरकारनं धनगर आरक्षणाच्या नावाखाली समाजाची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मुख्यमंत्री ज्यावेळी व्यासपीठावर भाषणासाठी उभे राहिले त्यावेळी त्यांना ‘क्या हुवा तेरा वादा’ हे गाणं ऐकवून आयोजकांनी आरक्षणाची आठवण करून दिली.

- Advertisement -