Friday, March 29, 2024
Homeमराठवाडाबीडधनंजय मुंडेंना नगर पंचायतीमध्ये जोरदार धक्का

धनंजय मुंडेंना नगर पंचायतीमध्ये जोरदार धक्का

बीड: धनंजय मुंडेंना नगर पंचायतीमध्ये जोरदार धक्का. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी हात मिळवणी करणारे शिरूर नगरपंचायतीचे नगरसेवक भिमराव गायकवाड यांना अपात्र ठरवण्यात आले. तसेच नगरसेविका आशा शिंदे यांच्याविरोधात दाखल केलेले अपील जिल्हाधिकार्‍यांनी फेटाळले आहे. त्यामुळे माजी मंत्री सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडे यांना हा जोरदार धक्का समजला जात आहे.

येत्या २१ मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तर २५ मे रोजी शिरूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर बीड जिल्ह्यासह शिरूरमध्येही राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. शिरूर नगर पंचायत एकूण १७ सदस्यांची आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (धस गटाचे) १०, भाजपचे ६ आणि १ अपक्ष (धस गट) असे १७ उमेदवार निवडूण आले आहेत. मात्र मागच्या तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे ७, १ अपक्ष आणि भाजपचा १ अशा ९ सदस्यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि संदीप क्षीरसागर यांच्यासोबत जाण्यास समाधान मानले.

चौथ्या अपत्याचे कारण पुढे करत धस गटाचे विनोद मारूती इंगोले यांनी धनंजय मुंडे गटाचे नगरसेवक भिमराव देवराव गायकवाड यांच्या अपात्रतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले होते. त्यानुसार विरोधकांनीही धस गटाच्या नगरसेवक आशा सुनिल शिंदे यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले. त्यांच्यावर अतिक्रमणाचा ठपका ठेवण्यात आला होता, याबरोबरच विरोधी पक्षनेत्यांच्या गटातील नगरसेवक ज्ञानेश्‍वर उटे यांच्या विरोधातही भाजपचे रावसाहेब हरिभाऊ ढाकणे यांनी आपील दाखल केलेले आहे. त्यांच्यावरही अतिक्रमणाचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.

गुरूवारी यातील दोन प्रकरणांचा निकाल जिल्हाधिकारी एम.देवेंद्रर सिंह यांनी दिला. यामध्ये नगरसेवक भिमराव गायकवाड यांना अपात्र ठरवण्यात आले, तर नगरसेवक आशा शिंदे यांच्या विरोधात दाखल केलेले अपील जिल्हाधिकार्‍यांनी फेटाळले आहे. त्यामुळे माजी मंत्री सुरेश धस यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का समजला जात आहे. भिमराव गायकवाड यांना अपात्र केल्यामुळे या ठिकाणी दोन्ही गटाचे आता आठ-आठ असे संख्याबळ झाले आहे. नगरसेवक ज्ञानेश्वर उटे यांच्या विरोधात दाखल केलेल्या आपिलासंदर्भात लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments