Placeholder canvas
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्र'मला जग सोडून जावंस वाटत होतं' : धनंजय मुंडे

‘मला जग सोडून जावंस वाटत होतं’ : धनंजय मुंडे

dhananjay munde get emotional on pankaja mundes viral video
बीड : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज 20 ऑक्टोबर बीडमध्ये पत्रकार परिषदेत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबतचे सर्व आरोप फेटाळले आहे. यावेळी बोलताना धनंजय मुंडे भावूक झाले. निवडणूक विचाराने लढवावी आणि जिंकावी. मात्र, असं घडल्यानं, या नात्यावर डाग लागल्याने हे जग सोडून जावं, असं वाटत. असेही धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे म्हणाले, “ज्या बहिणीसाठी 2009 मध्ये हा परळीचा मतदारसंघ सोडला, त्यांच्याकडूनच जर अशी बदनामी होत असेल आणि निवडणूक जिंकण्यासाठी हे होत असेल, तर असं राजकारणही नको आणि जीवनही नको. धनजंय मुंडे म्हणाले, “मी 17 ऑक्टोबला विड्याच्या सभेत जे बोललो त्यात एडीट करुन काही लोक आम्हा बहिण भावाच्या नात्यात विष कालवत आहेत. मागील 20 वर्षांपासून मी राजकारणात आहे, मात्र या घटनेने मन पिळवटून निघालं. मी माझ्या सख्या बहिणींकडून आधी राखी बांधली नाही, पण पंकजा आणि प्रितमकडून बांधली. याआधीही दोन भावांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न झाला. त्याचा परिणाम मी आजही भोगतो आहे. आमचं रक्ताचं नातं आहे. आम्हा बहिण-भावाच्या नात्यात कोण विष कालवण्याचा प्रयत्न करतो आहे याच्या खोलात जाणार. मी अनेक निवडणुका जिंकलो आणि हरलो. मात्र, कधीही कुणाविषयी असं व्यक्तिगत बोललो नाही.”

ज्याला विष कालवायचं होतं त्यांनी विष कालवून माझी बदनामी केली. अशा काही गोष्टी निवडणुकीच्या शेवटच्या काळात होतील, याचा अंदाज होता. मात्र, इतक्या खालच्या पातळीवर होईल, असं वाटलं नाही. निवडणूक विचाराने लढवावी आणि जिंकावी. मात्र, असं घडल्यानं, या नात्यावर डाग लागल्याने हे जग सोडून जावं, असं वाटत होतं. हा अभद्र आरोप निवडणूक जिंकण्यासाठी होत असेल तर असं राजकारणही नको आणि जीवनही नको.”

‘भाजपमध्ये आलेले नवे भाऊ या बहिण भावाच्या नात्यात विष कालवत आहेत’ धनंजय मुंडे म्हणाले, “मी असं काय केलं ज्यामुळे असं शेवटचं अस्त्र वापरलं. ज्यांनी हे केलं त्याच्यापर्यंत मी पोहचेन. आता नव्याने भाजपमध्ये आलेले नवे भाऊ या बहिण भावाच्या नात्यात विष कालवत असतील तर हे दुर्दैवी आहे. काही दिवसातच ही व्हिडीओ कुणी एडीट केली हे लोकांसमोर येईल. काल माझ्याविरोधातील आरोपांची शहानिषा न करता गुन्हा दाखल करण्यात आला.”

2009 मध्ये याच बहिणीसाठी या मतदारसंघाचा त्याग केला आणि याच बहिणीला निवडून आणलं. तेच लोक जर बदनाम करत असतील, तर जगावं की मरावं असा माझ्यासमोर प्रश्न आहे. धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळले. धनंजय मुंडे यांच्या विरोधात आष्टी येथे आमदार सुरेश धस यांनी मोर्चा काढला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments