Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडे भाजपातच, माझा भरोसा नाही : एकनाथ खडसे

पंकजा मुंडे भाजपातच, माझा भरोसा नाही : एकनाथ खडसे

Don't trust on me  Eknath Khadseपरळी : पंकजा मुंडे ह्या भाजपातच असणार असून माझा मात्र भरोसा नसल्याचे सांगत एकनाथ खडसे यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत सूचक वक्तव्य केले. यामुळे खडसे भाजपला सोडचिठ्ठी देतील हे निश्चित आहे.

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते. गोपीनाथ मुंडे यांनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नसल्याचे म्हणत भाजप नेतृत्वावर एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे शरसंधान साधले. यावेळी खडसेंनी आपल्या भाषणात मनातील खदखद व्यक्त केली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. शेटजी-भटजींचा पक्ष अशी ओळख असणाऱ्या भाजपला गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन समाजाचा पक्ष अशी ओळख मिळवून दिली. गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या संघर्षातून भाजपचे महाराष्ट्रात मजबूत स्थान निर्माण केले असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments