डीएसकेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टात मंजूर

- Advertisement -

महत्वाचे…
१.नऊ महिने त्यांनी अनेक ठेवीदारांचे पैसे थकवले असल्याचा आरोप २. पुण्यातील डीएसकेंची मालमत्ता ताब्यात घेऊन लिलाव करण्याची नोटीस सेंट्रल बॅंकेनी जाहीर केली. ३. आपण पैसे बुडवून पळून जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं होतं.


पुणे: प्रसिध्द बिल्डर डीएसके यांचा अटकपूर्व जामीन शुक्रवारी हायकोर्टात मंजूर झाला. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने हा जामीन नाकारला होता. यामुळे डीएसके कुलकर्णी यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

डीएसके यांनी ठेवीदारांचे पैसे थकवल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर छापे देखील पडले.त्यांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले. त्याविरूद्ध अटकपूर्व जामीन अर्ज त्यांनी कोर्टात दाखल केला होता. तो पुणे मॅजिस्ट्रेट कोर्टाने फेटाळला. आता त्यासाठी हाय कोर्टात डीएसकेंनी धाव घेतली होती. हायकोर्टात आज डीएसकेंच्या जामीन अर्जावर झाली आहे .
दरम्यान पुण्यातील डीएसकेंची मालमत्ता ताब्यात घेऊन लिलाव करण्याची नोटीस सेंट्रल बॅंकेनी जाहीर केली आहे. फसवणूक,एमपीआयडीए कायद्यान्वये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ठेवीदारांच्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला होता. जवळपास नऊ महिने त्यांनी अनेक ठेवीदारांचे पैसे थकवले असल्याचा आरोप आहे. पण आपण ठेवीदारांचे पैसै परत करणार असल्याचा दावा डीएसकेंनी केला होता. तसंच आपण पैसे बुडवून पळून जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं होतं.

- Advertisement -
- Advertisement -