Placeholder canvas
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रMLA Pratap Sarnaik | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर,कार्यालयावर ईडीचा...

MLA Pratap Sarnaik | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर,कार्यालयावर ईडीचा छापा

मुंबई l शिवसेना आमदार प्रताप सरनाईक Pratap Sarnaik यांच्या निवासस्थानी,कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने आज मंगळवार (24 नोव्हेंबर) सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक Vihang Sarnaik  आणि पूर्वेश सरनाईक Purvesh Sarnaik यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. ED raids residence Of Shivsena MLA Pratap Sarnaik

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईचं भाजपनं समर्थन केलं आहे.

आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे ठाण्यातील शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या मुलांच्या घरांवर आणि कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने छापेमारी केली आहे. मात्र ही छापेमारी कोणत्या प्रकरणी केली जात आहे याचा कोणताही खुलासा अद्याप झालेला नाही. विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक अशी प्रताप सरनाईकांच्या मुलांची नावे आहेत.

या प्रकरणामुळे कारवाईची शक्यता

दरम्यान अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना रनोट प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी यांना आवाज उठवत विरोध केला होता. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी तसेच त्यांची कोंडी करता यावी यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपच्या प्रवक्त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

सरनाईक कुटुंबियांच्या व्यवसायाशी तसेच इतर व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे ईडीकडून तपासण्यात येत आहे. त्याशिवाय गेल्या 4 वर्षात केलेले व्यवहार ईडी तपासणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजपाकडून कारवाईचं समर्थन

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. सरनाईक यांनी जर बेनामी मालमत्ता जमवली असेल. मनी लॉन्ड्रिंग केली असेल किंवा खोटी कमा केली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. मीही सरनाईक यांच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकल्या होत्या, असं सोमय्या म्हणाले. मी आमदार आहे म्हणून माझ्यावर कारवाई करू नका, असं म्हणणं योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments