Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeदेशनीरव मोदीकडे ६० कंटेनर विदेशी घड्याळ!

नीरव मोदीकडे ६० कंटेनर विदेशी घड्याळ!

nirav modi,nirav modis watches,imported watches,pnb,pnb fraud,panjab national bankमहत्वाचे…
१. १७६ स्टीलच्या  तिजोऱ्या जप्त
२. परदेशी घडयाळांचे प्लॅस्टिकचे ६० कंटेनर जप्त
३. मालमत्तांवर छापे सुरुच


मुंबई: पंजाब नॅशनल बँकेला ३० हजाकोटींचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेल्या नीरव मोदीच्या संपत्तीवर छापे टाकण्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी नीरव मोदीच्या आणखी काही मालमत्तांवर छापे टाकले. यावेळी नीरव मोदीच्या मालकीची १७६ स्टीलच्या तिजोऱ्या आणि महागडी परदेशी घड्याळे असलेले प्लॅस्टिकचे ६० कंटनेर जप्त करण्यात आले. मात्र छापासत्रात जमा होणाऱ्या मालमत्तेतूनही घोटाळा केलेली रक्कम वसूल होऊ शकत नाही. अशी चिंता वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे.

याशिवाय, ईडीकडून नीरव मोदीची काही बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. या बँक खात्यांमध्ये तब्बल ३० कोटी रूपये आहेत. तसेच नीरव मोदीच्या कंपनीच्या मालकीचे १३.८६ कोटी रूपयांचे शेअर्सही जप्त करण्यात आल्याचे समजते. तत्पूर्वी गुरुवारी ‘ईडी’ने नीरव मोदीच्या ९ अलिशान गाड्या जप्त केल्या होत्या. या गाड्यांमध्ये एक रोल्ज रॉयस घोस्ट, दोन मर्सिडिज बेंझ जीएल ३५० सीडीआयएस, एक पोर्शे पनामेरा, तीन होंडा, एक टोयोटा फॉर्च्युनर आणि एका टोयोटा इनोव्हा गाडीचा समावेश आहे. जप्त केलेल्या नऊ कारची किंमत १० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यातील रोल्ज रॉयस कारची किंमत सुमारे ६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी सीबीआयने नीरव मोदीच्या अलिबागमधील अलिशान फार्म हाऊसलाही टाळे ठोकले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments