नामांकित म्युझिक कंपन्यांवर ईडीचा छापा

- Advertisement -

मुंबई: अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने देशातील प्रमुख म्युझिक कंपन्यांवर छापे टाकले असल्याचे वृत्त आहे. सोनी, सारेगामा, टी-सीरीज, यशराज आदी म्युझिक कंपन्याच्या देशभरातील कार्यालयांवर ईडीने छापे घातले आहेत.

या म्युझिक कंपन्यांनी शेल कंपन्याच्या मार्फत मनी लाँड्रिंग केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत  आहे. मागील काही काळांपासून ईडीने मनी लाँड्रींग, शेल कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. ईडीच्या रडारवर म्युझिक कंपनी आल्या आहेत. ईडीच्या छाप्यामुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. या छाप्यातून काही महत्त्वाची माहिती हाती लागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -