Placeholder canvas
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ खडसेंच्या भाच्याला सहाय्यक पोलिस निरीक्षक बेपत्ता प्रकरणी अटक!

एकनाथ खडसेंच्या भाच्याला सहाय्यक पोलिस निरीक्षक बेपत्ता प्रकरणी अटक!

मुंबई: सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी गोरे (बिद्रे) बेपत्ता प्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ राजेश पाटील याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. राजेश हा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा आहे.

जळगावातून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. राजेश पाटील हा अभय कुरुंदकर यांचा मित्र असल्याचं समजतंय. अश्विनी बेपत्ता झाल्या त्या काळात कुरुंदकर आणि या दोघात मोबाईलवर संभाषण झालं होतं. कुरुंदकरांच्या सीडीआरवरून हे निष्पन्न झालय. बेपत्ता प्रकरणात राजेश पाटील यांचा संबंध असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पण राजेश पाटील याला अटक नाही तर चौकशीसाठी नेल्याचा पोलिसांनी खुलासा केला आहे. वरणगाव पोलीस स्टेशनला नोंद करून नवी मुंबई पोलिसांनी नेले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे २००६ साली पोलीस दलात दाखल झाल्या होत्या. त्यापूर्वीच एक वर्ष आधीच म्हणजेच २००५ साली त्यांचा विवाह हातकणंगलेमधील राजू गोरे यांच्याशी झाला होता. नोकरी लागल्यावर त्यांनी पुणे, नवी मुंबई, सांगली या भागात नोकरी बजावली. पण सांगलीत नोकरी करत असतानाच त्यांची ओळख एका पोलीस अधिकाऱ्याशी झाली आणि संसारात बाधाही निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी पतीशी संबंध तोडले आणि परस्पर प्रपंच थाटला. ही घटना घडली तब्बल दीड वर्षांपूर्वी. तेव्हापासून एपीआय बिद्रे या बेपत्ता आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments