Placeholder canvas
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रनिवडणूक : AB फॉर्म म्हणजे काय रे भाऊ?

निवडणूक : AB फॉर्म म्हणजे काय रे भाऊ?

मुंबई : सर्वच राजकीय पक्षात उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरु आहे. अधिकृत उमेदवारांना AB फॉर्म दिला जातो. अमूक इच्छूकाला पक्षाने AB फॉर्म दिला आपण ऐकतो त्या बाबत चर्चा असते. मात्र तो अर्ज काय असतो त्याबाबत जाणून घेऊ या.

शुक्रवारी विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. सर्वच राजकीय पक्षातील अधिकृत उमेदवारांची अर्ज दाखल करण्याची लगबग सुरु आहे. काहींना उमेदवारी जाहीर झाली नाही. तर काही उमेदवारांना पक्षाने गुपचूप AB फॉर्म दिला. मात्र सर्वसान्यांमध्ये याची चर्चा होती परंतु तो काय असतो तो जाणून घेऊ या.

A फॉर्म काय असतो…

A फॉर्म म्हणजे पक्षाने दिलेला अधिकृत उमेदवार म्हणून मिळालेला फॉर्म असतो. हा अर्ज अधिकृत राजकीय पक्ष देऊ शकतो. त्या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंद असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे या अर्जावर पक्षाचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षाने नेमणुक केलेल्या संबंधित अधिका-याची सही लागले. या फॉर्मवर ओरीजनल सही असायला हवी.

सही सोबत पक्षाचा शिक्का असतो. विशेष म्हणजे हा अर्ज झेरॉक्स म्हणून स्विकारल्या जात नाही. पक्षाने दिलेला मूळ अर्ज लागतो.

B फॉर्म काय असतो…

B फॉर्मवर पर्यायी उमेदवाराचे नाव असते. काही कारणास्तव मुळ उमेदवाराबद्दल काही त्रूटी निर्माण झाल्या किंवा त्याने नकार दिला. तर B फॉर्मवरील उमेदवार हा अधिकृत उमेदवार होतो. त्याला पक्षाचा अधिकृत चिन्ह मिळतो.

विशेष म्हणजे AB फॉर्मची मूळ प्रत ग्राह्य धरली जाते. झेरॉक्स कॉपी मान्य केली जात नाही. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत तो भरू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments