Placeholder canvas
Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रदहावी आणि बारावीच्या पुरवणी परिक्षा 17 जुलैपासून

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परिक्षा 17 जुलैपासून

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी परीक्षा येत्या 17 जुलैपासून घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत पुरवणी परिक्षा घेण्यात येईल.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) पुरवणी लेखी परिक्षा 17जुलैपासून 30 जुलैपर्यंत घेण्यात येईल. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) पुरवणी लेखी परीक्षा 17 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत घेण्यात येईल. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) व्यवसाय अभ्यासक्रम पुरवणी लेखी परीक्षा 17 जुलैपासून 31 जुलैपर्यंत  घेण्यात येईल.

इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी असून परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे विभागीय मंडळामार्फत छापील स्वरुपात दिलेले वेळापत्रक अंतिम असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments