Friday, March 29, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेनराधम बापाचा पोटच्या अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार

नराधम बापाचा पोटच्या अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार

पुणे – पोटच्या अडीच वर्षाच्या मुलीवर वडिलांनीच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने बुधवारी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी पीडितेच्या नराधम पित्यास अटक केली आहे.

आरोपी हा चालक आहे. दारूच्या नशेत आरोपीने ८ दिवसांपूर्वी बायको अंघोळीला गेलेली असताना आपल्या अडीच वर्षाच्या मुलीवर राहत्या घरात अत्याचार केला. आई अंघोळीवरून आली असता, तिने स्वतः डोळ्याने हा प्रकार बघितला. त्यावेळी पीडित मुलीच्या आईने नराधम पतीला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिलाही मारहाण केली.
या घटनेच्या मानसिक धक्क्यातून सावरल्यानंतर पीडित मुलीच्या आईने सांगवी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी २५ वर्षीय बापाला अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार व बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments