कोल्हापूर महामार्गावर ट्रॅव्हल्सला भिषण आग; दोघांचा मृत्यू

- Advertisement -

कोल्हापूर – गगनबावडा महामार्गावर शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटमध्ये २ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. विकी मदन भट (वय २४) व बंटीराज भट (वय २४) (दोघे रा.रोषणपुरा, भोपाळ मध्यप्रदेश, सध्या रा. हाड्पसर, पुणे) अशी त्या मृतांची नावे आहेत.

कोल्हापूर गगनबावडा महामार्गावरून आत्माराम ट्रॅव्हल्सची (युपी-६२- एटी ६३६२) ही प्रवासी बस एकूण १८ प्रवाशी घेवून गोव्याहून मुंबईकडे जात होती. त्यावेळी शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही बस लोंघे येथे आली असता, या गाडीला अचानक आग लागली. बसला आग लागल्याचे लक्षात येतात बस चालकाने तात्काळ गाडी थांबवली व प्रवाशांना खाली उतरण्याची सुचना केली. त्यावेळी घाबरलेल्या प्रवाशांचा बसमधून बाहेर पडण्यासाठी एकच गोंधळ उडाला होता.

- Advertisement -